जनचेतना/गोंदिया/विवेक हरिनखेड़े
विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची जाणीव व्हावी या उद्देशाने व लोकशाही पद्धतीने निवडणूक तिचे महत्त्व पटवावे यासाठी जी. ई .एस. कनिष्ठ महाविद्यालय रावणवाडी आज इथे शालेय विद्यार्थी परिषद ची निवडणूक घेण्यात आली आकर्षणाची गोष्ट ही आहे की ही निवडणूक मोबाईल ईव्हीएम या ॲप द्वारे घेण्यात आली यामध्ये ईव्हीएम मध्ये उमेदवाराची नावासह त्यांचे फोटो अपलोड करण्यात आले. त्यांना चिन्हांचे वाटप करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना त्यांनाच का मत द्यावे हे उमेदवाराकडून विद्यार्थ्याना पटवण्यात आले. पोलीग वन ऑफिसर पोलीग टू ऑफिसर पोलीस थ्री ऑफिसर व प्रसादिंग ऑफिसर यांच्या जबाबदाऱ्या त्यांना समजावण्यात आल्या विद्यार्थ्यांना ह्या सर्व बाबी खूप कौतुवास्पद वाटल्या. व त्यांना भारतीय निवडणूक मतदान पद्धती कशी चालते याची जाणीव झाली. सर्व विद्यार्थ्यांच्या स्फुर्त असा प्रतिसाद ईव्हीएम मतदान पद्धतीत मिळाला. जी.ई.स. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य हटवार मॅडम, प्राध्यापक मेंढे सर, प्राध्यापक भेलावे, सर प्राध्यापक लिल्हारे सर प्राध्यापक नागपुरे सर प्राध्यापिका पल्लवी मॅम प्राध्यापिका पूजा मॅम प्राध्यापिका सपना में व पांडे जी यांनी मुलांना मार्गदर्शन करून निवडणूक करण्यास प्रवृत्त केले व या निवडणुकीच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
जी.ई.एस. जुनिअर कॉलेज रावणवाडी शालेय मंत्रिमंडळ शाळा नायक प्रणव हरीणखेडे, विद्यार्थी प्रतिनिधी काजल बिसेन, क्रीडा प्रमुख गौरव हरिनखेडे, सहल प्रमुख भूमिका उईके, सांस्कृतिक प्रमुख भारती बिसेन स्वच्छता प्रमुख चेतना पारधी इत्यादि यांची निवड करण्यात आली.