राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना मागणी
जनचेतना/गोंदिया/आरती पारधी
एनसीपी नेते प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना मा.जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या मार्फत अतिवृष्टीमुळे गोंदिया जिल्हयातील धान,मक्का, भाजीपाला, फळबागे तसेच गाव खेडयामध्ये मोठया प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठे यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन किवा पंचनामे न करता सरसकट तातडीने जास्तीत जात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्हयात होत आललेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या प्रमाणात घरे व गुरांची गोठे क्षतिग्रस्त होऊन नुकसान झाले आहे. तसेच पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हयात धानाचे पिक मोठया प्रमाणावर असुन धान पिकाची नुकसान झालेली आहे. तसेच जिल्हयातील अनेक शेतकरी नगदी पिके म्हणन भाजीपाल्याची लागवड सुध्दा केलेली आहे. परंतु काही दिवासापासून सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने धान, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.
सोबतच अतिवृष्टीमुळे रोड, रस्त्यांची खराबी झालेली असल्याने तातडीने डागडुगी कऱण्यात यावी तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर तातडीची उपाययोजना व त्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांच्या आरोग्याकरीता औषधांचा साठा व डास, डेंग्यूची फवारणी इत्यादी औषधी तातडीने उपलब्ध करण्याबाबत विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना प्रामुख्याने माजी आमदार राजेन्द्र जैन, बाळकृष्ण पटले, केतन तुरकर नानू मुदलियार, नागो बनसोड, अखिलेश सेठ, सुनील पटले, शैलेश वासनिक, प्रशांत सोनपुरे, रौनक ठाकूर, श्रेयस खोब्रागडे आदी उपस्थित होते.