जनचेतना/मोरगॉंव अर्जुनी/प्रशांत उके
मोदींच्या “चारशे पार” च्या नादात त्यांचे मंत्री आता बेताल वक्तव्य करू लागले आहेत. रोखठोक बोलणारे गडकरीही यातून सुटू शकले नाहीत. अर्जुनी मोर येथे महायुतीचे उमेदवार सुनील मेन्ढे यांच्या प्रचारार्थ आलेल्या गडकरींनी आज जे काही वक्तव्य केल. त्यावरून आता चांगलाच गदारोड माजला आहे. सुनिल मेन्ढे हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांच्या मागे मोदींची ताकद,माझी ताकद आहे. त्यांचीही ताकद आता जुडणार आहे.सुनिल मेन्ढे अस “शिलाजीत” देऊ कि,एकदम जोरात “काम” होईल. त्यांच्या या वक्तव्यांचा सार लक्षात येताच त्यांनी आपला सुर बदलवित त्याला विकासाची जोड दिली. आता याच वक्तव्याला घेत संपूर्ण मतदारसंघात एकच एक चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघात प्रशांत पडोळे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यापासून भाजपाचे टेन्शन वाढले आहे. भाजपचे उमेदवार सुनिल मेन्ढे आता विकासाची बात करण्यावर जोर देत आहेत.प्रशात पडोळे, मेन्ढे “वाॅर पे वाॅर” होत आहेत. अशा स्थितीत विकासाचे राजकारण समोर आणल्या जात आहे. आज सुनिल मेन्ढे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अर्जुनी मोर येेथे प्रचारसभा घेण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करतांना गडकरींनी विकासाचे विविध दाखले दिलेत. भंडारा गोंदिया व जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय काय केले याचे त्यांनी पाढेच वाचून दाखविले. सुनिल मेन्ढे विकासाचा शिलेदार आपणास निवडून दयायचा आहे असे आवाहन गडकरींनी केले. पण या भानगडीत त्यांनी “शिलाजीत” चा वापर केला. सुनिल मेन्ढे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांच्या मागे मोदींची ताकद, माझी ताकद आहे. त्यांचीही ताकद आता जुडणार आहे. सुनिल मेन्ढे अस “शिलाजीत” देऊ कि,एकदम जोरात काम होईल. असे वक्तव्य करताच उपस्थितही काही वेळ चक्रावून गेले. आपल्या बोलण्यात चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी याला विकासाची जोड दिली.