लाईन चे लपंडाव सुरूच नागरिक त्रस्त

Spread the love

जनचेतना/मोरगॉंव अर्जुनी/प्रशांत उके

अर्जुनी मोर तालुक्यातील आसपासच्या ग्रामीण भागात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे व सतत होणाऱ्या विजेच्या लपांडावाने नागरिक त्रस्त झाले असून गावात महावितरण विषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पिंपळगाव, अरंतोडी, दाभना, सह परिसरात महावितरणचे हजारो ग्राहक आहेत. महावितरण कंपनीला येथून लाखोंच्या घरात विजबिलापोटी रक्कम जमा होते. वेळेआधीच बिलाची अव्वाच्या सव्वा आकारणी करून वसुली करणाऱ्या महावितरणला ग्राहकांना द्यायच्या सुविधांचा मात्र नेहमीच सोयीस्कर विसर पडतो. अव्वाच्या सव्वा बिल, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महावितरणच्या उघड्या व खाली लोमकणाऱ्या तारा नागरिकांच्या जिवावर बेतू लागल्या आहेत. वीजवाहक तार तुटून व्यक्ती, जनावरांचा मृत्यू व जखमी होण्याच्या घटना वर्षभर वारंवार घडत असतात. असे असताना दुरुस्तीच्या नावाखाली नेमकी कोणती कामे केली जातात, हा यक्षप्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

नुकत्याच उन्हाळ्या सुरू झाला असून सध्या उष्णता कायम असल्याने लहान मुलासह आबालवृद्धांना उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होत असताना दिसत आहे. वीजेच्या खेळखंडोबामुळे लोकांना फॅन आणि कुलरचा वापरही नीट करता येत नाही. त्यामुळे परिसरातील जनता गर्मीने होरपळून निघत आहे. दर दहा-वीस मिनिटात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांत वीज वितरण बाबत संताप व्यक्त केला जात आहे. थोडाही वारा सुटला की लाईन गुल होते. याबाबत विचारणा केली असता वरूनच लाईन गेल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे विजेची समस्या सोडविण्याकरिता कोणतेही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, समाजसेवक व इतर कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही ही एक शोकांतिका आहे. विजेच्या या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक उपकरने निकामी होण्याची भीती वाढली आहेत.
तर वीज गुल झाल्यास ती नियमित होण्यास किती वेळ लागेल याची काहीच शास्वती नाही. विजेच्या लपंडाव दरम्यान गुल झालेला वीज पुरवठा सुरू होण्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांना संपर्क करण्याशिवाय पर्याय नाहीत मात्र संपर्क केल्यावरही वीज पुरवठा नियमित होण्यास मोठी दिरंगाई केली जात आहे. यामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. तरी गावसह परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.