आमदार सुधाकर अडबालेः विमाशी संघाचे महानगर अधिवेशन.
जनचेतना/नागपुर/दिलीप तराळेकर
नुकताच शासनाने शिक्षकासाठी ड्रेस कोड लागु करुण त्यावर टी आर असे स्टिकर लावावे असा शासन आदेश निर्गमित केला . यावर शिक्षक आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की शिक्षकांच्या नावापुढे टीआर (Tr. ) लावून आम्ही मोठे होणार नाही. ही आमची मागणी नसतांना शासन जबरदस्तीने गणवेश व टीआरची सक्ती करीत आहे.आम्हाला सन्मान नको आमच्याकडे असलेले अवांतर कामे काढा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्या. जुनी पेंशन योजना याकडे सुध्दा लक्ष द्या.
शिक्षणाचे खासगीकरण करून शिक्षणक्षेत्र हे खिळखिळे करण्याचा चंग बांधला जात आहे. शिक्षण क्षेत्रातील पिछेहाट थांबविण्याची क्रांतीकारी आंदोलन करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नागपूर शहर अधिवेशन सक्करदरा, नागपूर येथील सेवादल महिला महाविद्यालय सभागृहात रविवार ७ मार्च रोजी पार पडले. त्यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे होते. व्यासपीठावर आमदार अभिजीत वंजारी, राजाराम शुक्ला,प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख, स्वागताध्यक्ष सेवादल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे, गिरीश पांडव,डॉ. अशोक गव्हाणकर, प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, प्रांतीय कोषाध्यक्ष भुषण तल्हार, जगदीश जुनघरी, महेंद्र सालंकर, संजय महाकाळकर, मधुकर भोयर, जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, कार्यवाह संजय वारकर उपस्थित होते. अधिवेशनाच्या पहील्या सत्रात विद्यार्थी, पालक, शिक्षण व शिक्षक विषयक बाबींवर चर्चा करण्यात आली. माजी आमदार व्ही.यु. डायगव्हाणे म्हणाले की शासनाचे संचमान्यता धोरण शिक्षकांना देशोधडीला लावणारे आहे. काम नाही तर वेतन नाही हा ८ जून २०१६ ला काढलेला निर्णय रद्द झाला पाहिजे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे धोरण चुकीचे आहे. मुख्याध्यापकांसंबंधी काढलेले नियम रद्द करावे, महिला शिक्षिकांसंबंधी नियमात आवश्यक ते बदल करावे असेही ते म्हणाले. आमदार अभिजित वंजारी, डॉ. अशोक गव्हाणकर, राजाराम शुक्ला,अरविंद देशमुख, गिरीश पांडव यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अध्यक्ष विठ्ठल जुनघरे यांनी केले. तर कार्यवाह अविनाश बडे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. संचालन जयश्री धात्रक यांनी तर आभार प्रा. सरीता मिर्झापूरे यांनी मानले. याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ महानगरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष -विठ्ठल जुनघरे, कार्यवाह- अविनाश बडे, कार्याध्यक्ष – अरुण कराळे , कोषाध्यक्ष गंगाधर पराते, संघटन सचिव राकेश दुम्मपलवार, उपाध्यक्ष- मुकुंद चहांदे, यशवंत कातरे, अर्चना भोंडे, देविदास कोरे,सहकार्यवाह – मंगेश घवघवे, सुनील मुळे, प्यारेलाल लोणारे, राजू मोहोड, दिपक सातपूते , महीला प्रतिनिधी -रंजना पेटकर, करीष्मा गलानी, संघटक – प्रमोद अंधारे, धनराज सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तानबा बाराहाते, धनराज सुर्यवंशी यांनी जबाबदारी पार पाडली.अधिवेशनासाठी दिलीप बोके, वामन सोमकुवर, प्रशांत शेळकुळे, गजानन भोरळ , सुनीता वेरूळकर आदींनी सहकार्य केले.