जनचेतना/गोंदिया/आरती पारधी
गोंदिया: दिनांक 05 एप्रिल 2024 ला ग्रामपंचायत नगपुरा मूर्री येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेला ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, शाळेतील शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, संबंधित अधिकारी व बहुसंख्येने गावातील नागरिक गन सदर वेळेस उपस्थित राहून व एकत्र येऊन शपथ ग्रहण घेतले.
मतदारांसाठी अशी आहे प्रतिज्ञा आम्ही भारताचे नागरिक, लोकशाही व निष्ठा ठेवून , याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेची जतन करू आणि मी नी:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश,जात, समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. अशा प्रकारे सर्वांनी हाथ समोर करून शपथ घेतली, ह्यावेळी ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक सरपंच सौ. कविताताई लीचडे, अंगणवाडी सेविका राजलक्ष्मी हरीनखेडे,रेखा इंदुरकर, दुर्गा एरणे, कविता अंबादे पोलीस पाटील प्रवीणकुमार कोचे, सह ग्रामपंचायत कर्मचारी व इतर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.