पाच कुटुंबांना हलवले सुरक्षित स्थळी ; लाखांदूर ,भंडारा आणि पवनी येथे चमू तैनात

Spread the love

जनचेतना/भंडारा/तुषार पशीने : गेल्या दोन दिवसातील झालेल्या पावसामुळे व धरणातील विसर्गामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती असून काल रात्रीपासून.जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर निवासी उपजिल्हाधिकारी, नीता बेलपत्रे उपविभागीय अधिकारी भंडारा गजेंद्र बालपांडे आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अभिषेक नामदास यांनी भेट देऊन पाहणी केली.जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आज सकाळी खात रोड तसेच नदीकाठची गावे भोजापुर, गणेशपुर ,दवडी पार ,जवाहर नगर ,कोंडी , कारधा, टाकळी येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच भंडारा शहरातील पंप हाऊस आणि पुर संरक्षक भिंत येथे मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यासोबत देखील पाहणी केली.

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास लाखांदूर ,भंडारा, पवनी येथे जिल्हा शोध व बचाव पथक तसेच एसडीआरएफ ची टीम तैनात करण्यात आले आहेत.सध्या प्राप्त माहितीनुसार बॅकवॉटरचे पाणी असून काही वेळात ते कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. कारधा येथील तीन आणि गणेशपूर येथील दोन कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी देखील पूर परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष द्वारे वेळोवेळी पावसाचे अलर्ट आणि अन्य माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.