जनचेतना/भंडारा/तुषार पशीने : रोजगार निर्मिती पासून पायाभूत सुविधांपर्यंत अशा वेगवेगळ्या नऊ प्रमुख बाबी लक्षात घेऊन सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प संपूर्ण भारताचा वेध घेणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. मध्यमवर्गीयांना दिलासा देणाऱ्या अर्थसंकल्पात नोकरदारांनाही धीर देण्याचे काम केले आहे.
तीन लाखापर्यंतच्या मिळकतीवर कर लागणार नाही.रोजगार वाढविण्यासाठी तीन नवीन प्रोत्साहन योजना सुरू करून रोजगार देणाऱ्या कंपन्यांना सरकार मदत करणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात कंपनीने रोजगार दिल्यास पहिला पगार हा सरकार देईल असेही अर्थमंत्र्यांनी घोषित केले. हा निर्णय नक्कीच रोजगाराभिमुखतेची जाणीव करून देणार आहे. उत्पादकता, रोजगार, सामाजिक न्याय, शहरी विकास, ऊर्जा, सुरक्षा, पायाभूत सुविधा, नवकल्पना आणि सुधारणा यांचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा असल्याचे मत सुनील मेंढे यांनी व्यक्त करताना शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातही हा अर्थसंकल्प परिवर्तन घडवून आणणारा असल्याचे ते म्हणाले.