जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके : तालुक्यात चार दिवसापासून सतत सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे अर्जुनी मोर नगरातील लागुन असलेल्या तलावात जलभराव होऊन तलावशेजारील घरांमध्ये पाणी साचून बिकट परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे वार्ड नंबर 5 येथील घरांमध्ये पाणी घुसले व त्यामुळे तेथील नागरिकाना त्रास सहन करावा लागत आहे. येथील जुने घरे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही तक्रार लक्षात येताच डॉ. भारत लाडे सामाजिक कार्यकर्ता तथा उपाध्यक्ष युवक काँग्रेस गोंदिया यांनी कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली व नगरपंचायत अर्जुनी मोर येथील नगरसेवक पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तलावातील पाण्याचा निचरा वाढवून स्थानिकांच्या घरातील पाणी साचल्याने विस्कळीत झालेले जनजीवन सामान्य स्थितीत आणण्यासाठी मदत केली.
दरवर्षीच नागरिकांना या परिस्थितीचाचा सामना करावा लागत असल्याने स्थानिकांनी पट्टे देऊन त्वरित घरकुल सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी एकसुराने मागणी केली ..यावेळेस सोबत नगरसेविका शिला उईके , नगरसेवक यशकुमार शहारे, महेश सांगोळे, केतन शहारे,भारती सांगोळे, लारोकर, चंद्रशेखर उप्रीकर, प्रकाश सांगोळे, खुशाल राऊत,सोनू शहारे,सूर्यकांत उपरिकर, प्रभा रावेकर,रामू कुठारे, चेतना सांगोळे, प्रतिमा शहारे, व अनेक नागरिक उपस्थित होते.