आता लाडक्या भावांसाठीही आली योजना ! १२ वी उत्तीर्ण झालेल्याना ६ हजार रूपये तर डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10 हजार रूपये मिळणार

Spread the love

जनचेतना/पंढरपूर :- लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने राज्यातील लाडक्या भावांसाठी एक विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका विशेष योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून  माध्यमातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रूपये तर डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची रक्कम स्टायपंड म्हणून मिळणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले कि, राज्यभरातील माझ्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये दरमहा जमा होतील. काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, पण राज्यातील लाडक्या भावाचं काय असा प्रश्न विरोधक विचारत होते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी मोठी घोषणा केली आहे. याचा लाभ मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच, यामुळे बेरोजगारीमध्ये घट होईल असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यानुसार आता बारावी पास झालेल्यांना ६ हजार रूपये, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार रूपये आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला १० हजार रुपये महिन्याला स्टायपंड दिला जाणार आहे. त्यामध्ये, वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो प्रशिक्षित होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे, इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण या योजनेनंतर लाडक्या भावांसाठीही खास योजनेची घोषणा केली आहे. जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा ६ हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला ८ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेतून महिला वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीच मिळालं नसल्याची टीका होत होती. मात्र मुख्यमंत्र्‍यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेचं औचित्य साधून विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे. बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार , डिप्लोमा ८ आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.