जनचेतना/तिरोडा/पोमेश रहांगडाले
तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रात सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या असून यामध्ये त्यांचे मोठे योगदान समजले जाते त्यासोबतच विधानसभा क्षेत्रात रोस्त रस्ते व पूल बांधकामासाठी शासनाकडे नेहमी मागणी करीत असून बहुतांश रस्त्याचे काम सा.बा.विभाग व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आलेले आहेत व काही प्रगतीपथावर आहेत या वर्षी पावसाळी अधिवेनशात आमदार महोदयांनी तलाठी कार्यालयकरिता मागणी केली असता तिरोडा तालुक्यातील २९ तलाठी कार्यालयाकरिता ४ कोटी ३५ लक्ष रुपयाचा निधी शासनाक्डून मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अर्जुनी, बोदा, सेजगाव, बघोली, खैरलांजी, करटी बूज., पालडोंगरी, काचेवानी, मेंदीपूर, इंदोरा खुर्द., गराडा, खैरबोडी, तिरोडा, बेलाटी बूज. कवलेवाडा, मुंडीपार, धादरी, घोगरा, सरांडी, गांगला, नवेगाव खुर्द, मुरमाडी, सिल्ली, नवेझरी, कोडेलोहारा, लाखेगाव, भजेपार, मेंढा, सुकडीडाक. या गावांचा समावेश असून तलाठी कार्यालय मंजूर केल्याबद्दल राज्याचे नागरिकांनी आमदार महोदयांचे आभार मानले आहे.