गोठणपार येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन गोंदियाच्या वतीने जाहीर निषेध

Spread the love

जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके

अर्जुनी मोर.:: लोकशाहीचा उत्सव संपूर्ण जिल्हा साजरा करीत असताना मानवतेला काळिमा फासणारी घटना देवरी तालुक्यातील गोठणपार येथे आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी लग्न समारंभ करिता आली असता तिचे अपहरण करून लैगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली. या घटनेचा नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन, नेशनल आदिवासी कर्मचारी फेडरेशन, महिला फेडरेशन, बिरसा ब्रिगेड व विविद्द सामाजिक संघटन अर्जुनी मोर. च्या वतीने उपजिल्हाधिकारी एसडीओ यांना निवेदन देण्यात आला. आरोपीचा तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात पूर्णतः उदासीन आहे. सरकारने आणि प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांच्या सुरक्षा करिता ठोस पावले उचलावी अशी मागणी सुद्धा यावेळी नेशनल आदिवासी पिपल फेडरेशनने केली . उपजिल्हाधिकारी एसडीओ यांना निवेदन देताना प्रामुख्याने प.स. सभापती कोडापे नेशनल आदिवासी पीपल फेडरेशन तालुका अध्यक्ष राजकुमार गेडाम. प.स. सदस्य भाग्यश्री सायाम,प.स. सदस्य नाजूक कुंभरे, मुरारिजी पधरे, वाढवे सर, कुंभरे सर ,विभिन्न आदिवासी सह समाज इतर महिला, आणि नागरिक, युवक, यावेळी उपस्थित होते.