जनचेतना/अर्जुनी मोर/प्रशांत उके
जिल्हा परिषद शाळेचे नविन शैक्षणिक सत्र सुरु झालेले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी १ ते ४ तर काही ठिकाणी १ ते ७ पर्यंत वर्ग असलेल्या जि.प. शाळा आहेत. परंतु या शाळामध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे. विद्यार्थ्यांचि शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या बौध्दिक क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी केली आहे.
प्रत्येक गावात विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावा यासाठी सरकार गावा गावात जिल्हा धरिषद शाळेची निर्मीती केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा घडावे. विद्यार्थ्यांना बाहेर जाऊ नये विद्यार्थ्यांच्या आयुष्य घडविण्यात यावे. भावी पिढीला ज्ञान मिळावे. हे सर्व उद्याचे ठेवून या शाळांचे निर्मिती झाली आहे. परंतु प्रत्येक शाळेत आज शिक्षकांची कमतरता जाणवत आहे.जिल्हा परिषद शाळे मध्ये १ ते ४ वर्गापर्यंत १ ते २ शिक्षक आहेत.तर ज्या गावात हे वर्ग १ ते ७ वर्ग आहेत त्या शाळेवर दोन ते तीन शिक्षक आहेत. या एक ते चार वर्गापर्यंत काही ठिकाणी एक शिक्षक तर काही ठिकाणी दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केल्या जाऊ शकत नाही. जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकवण्यापेक्षा काही कामांचे ओझे पडू लागले आहे. जनगणना, निवडणुकीचे कामे शिक्षकाकडूनच करून घेतली जातात. तसेच मतदान पुननिरीक्षण बीलओ या कामांचाही तान शिक्षकांवर दिल्या जाता आहे. त्याच्या परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. एका शिक्षकावर वर्ग एक ते चार शिकवण्याची वेळ आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक ज्ञान मिळत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे.
ब्राकेट वडगाव बंध्या येथे एक आठवड्यात शिक्षकांची नियुक्ती केली नाही तर शिक्षण विभागाच्या विरोधात गुन्हा नोंद करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद चंद्र पवार पक्षाकडून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा मिथुन मेश्राम यांनी दिला.
दुसरा ब्राकेट शिक्षण विभागाने शिक्षणावर व अध्यापनावर लक्ष केंद्रित केले आणि इतर कामासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळेल व त्यांची बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होईल. त्यामुळे अशा शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी मिथुन मेश्राम कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी केली.शाळेतील इमारती या जीर्ण अवस्थेत असल्याने व मूलभूत सोयी सुविधा नसल्याने शाळेमध्ये शैक्षणिक वातावरण योग्य निर्माण करता येत नाही त्यामुळे सर्व ग्रामपंचायत यांनी त्यांच्या 15 व्या वित्त आयोगातून शाळांना सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे तरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळू शकेल.
समाज विकास, समाज परिवर्तन व देशाचे भावी नागरिक घडवण्याचे कार्य शिक्षणाच्या माध्यमातून होत असते त्यामुळे शिक्षण देणारी यंत्रणा जोपर्यत प्रभावीपणे कार्य करणार नाही तेव्हापर्यंत उच्च दर्जाचे विद्यार्थी व नागरिक घडू शकणार नाही.
शिक्षकांकडे सोपविलेली अतिरिक्त कामांची जबाबदारी यातच त्यांचा वेळ वाया जात असल्याने त्यांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.