जनचेतना/अर्जुनी मोर/प्रशांत उके
राज्यात 1 जुलै 2024 पासुन विदर्भातील संपूर्ण शाळा सुरु झाल्यात आणि सर्वत्र शाळा प्रवेश उत्सव दिवस साजरा करण्यात आला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव/बंध्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत केवळ दोनच शिक्षक असुन विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.जि प शाळेत एकुन 1 ते 7 वर्ग आहेत.पहिल्या वर्गात 11,दुसरीत 22,तिसरीत 18,चौथीत 19,पाचवीत 14,सहावीत 14 तर सातव्या वर्गात 13 असे एकुण 112 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असुन अशा परिस्थितीत एकूण 5 शिक्षकांची गरज असताना शाळेला दोनच शिक्षक असून 3 पदे रिक्त आहेत.विद्यार्थांच्या पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने शासानाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्याने सर्व पालक शिक्षक मिळतील अशी अपेक्षा लावून होते परंतु जिल्हा परिषदेने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही शिक्षक शाळेला दिला नाही.
त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी,जि प उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती, गटशिक्षणाधिकारी,जि प सदस्य,पं स सभापती,उपसभापती यांना शुद्धा निवेदन दिले.परंतु गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांची अजुनही नियुक्ति केली नाही.त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष आहे आणि म्हणून जोपर्यंत शाळेत कमीत कमी 2 शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत दि.05 जुलै 2024 पासुन एकही विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे आहे.तसेच विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला शासन आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहिल अशी माहिती वडेगाव/बंध्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरोज मेंढे यांनी दिली आहे.
प्रतिक्रया – गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांमुळे शिक्षकांची कमतरता भासत आहे जिल्हा परिषद शाळा वडेगाव/बंध्या येथे लवकरच शिक्षकांची नियुक्ति केली जाईल.
ईंजि.यशवंत गणवीर -जि प उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती जि प गोंदिया