५०००० हजार च्या आमिष दाखवून महिलाकडुन घेतले जातात १०० ते २०० रुपये

Spread the love

जनचेतना/मोरगांव अर्जुनी/प्रशांत उके

सध्या ग्रामीण भागामध्ये एका संस्थेमार्फत योजनेच्या नावावर ग्रामीण भागातील महिलांकडून शंभर ते दोनशे रुपये घेतले जात आहेत योजनेचे नाव सांगून योजनेच्या नावावर प्रत्येक महिलांना ५०००० हजार रुपये भेटतील अशी आमिष दाखवून ग्रामीण भागातील महिलांकडून योजने करता लागणारे कागदपत्रे म्हणून शंभर ते दोनशे रुपये घेऊन महिलांची फसवणूक होत असल्याचा प्रकार सध्या चालू आहे ग्रामीण भागातील महिला हे पन्नास हजार रुपये भेटतील या आशेने बराच महिलांनी योजना म्हणून संबंधित घरापर्यंत येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी शंभर ते दोनशे रुपये दिले आहेत असेच प्रकार भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या चारही जिल्ह्यांमध्ये हा प्रकार एका संस्थेद्वारे संचालित वाईस ऑफ योजना दर्पण ह्या नावाच्या हिंदी वृत्तपत्र असून व्हाईस ऑफ योजना दर्पण या साप्ताहिक वृत्तपत्राच्या मार्फत गावागावातल्या संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आर्थिक दुर्बल गरीब अपंग इत्यादी असे गरीब महिला व घटकातील व्यक्तीचे आर्थिक सर्वे करण्याच्या नावावर ही मोहीम गावातील एका कोणत्या व्यक्तीकडून राबवत आहेत तर या व्यक्तीला यासंदर्भात संबंधित संस्थेविषयी कोणत्याही पद्धतीची माहिती नसतानाही तो प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शंभर ते दोनशे रुपये घेत आहे कोणी एखादा प्रतिष्ठित व्यक्तींनी माहिती विचारल्यास काहीतरी उडवा उडवी चे उत्तर देणे आणि ग्रामीण भागातील महिलांना मूर्खपणाचे काम सध्या चालू आहे.

आर्थिक दुर्बल घटकाचे जीवन मान उचवण्यासाठी शासन बऱ्याचशा योजना राबवत असून बरस बरेचशे योजना शेवटच्या व गरजू माणसापर्यंत पोहोचत नसल्याचे सांगून अशा काही गोष्टी हेरून योजनेअंतर्गत ही मोहीम राबवण्याचे काम संबंधित व्यक्त करून चालू आहे ह्या संदर्भात सर्वे करताना संस्थेकडून नियुक्ती करून दिलेले रिपोर्टर किंवा व्हॅलेंटियर हे गावातील कोणत्या व्यक्तीकडून पैसे घेणार नाहीत व तसे प्रकार आढळून आले असते त्याच्या त्वरित योग्य कारवाई करण्याची संपूर्ण मुभा असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे मात्र संस्थेकडून येणारे हे कोणते प्रकारचे रिपोर्टर नसून त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र नसून अशा या लोकांकडून ग्रामीण भागातील महिलांकडून शंभर ते दोनशे रुपये घेऊन महिलांची लुट होत आहे.

त्यामुळे गावातील ग्रामपंचायत व संबधित लोकांनी विशेष लक्ष देण्याचदेण्याची गरज आहे. असेच प्रकार सध्या जोरदार स्वरूपाचे काम गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोर येथे पण चालु आहे. काही महिला सध्या अर्जुनी मोर तालुक्यात पण वास्तव्यात आले आहेत. पहिल्यांदा १०० रुपये मागत आहेत आणि नंतर २०० रुपये. सामान्ये महिलांचा कसबस मन जिंकवून पैसे मागुन दलाल लोक आपले पोट भरत आहेत असा लोकांना पासुन सावधान राहावे.