जनचेतना/तिरोडा/पोमेश रहांगडाले
तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राअंतर्गत विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रस्ता बांधकामे सुरु असून सदर काही बांधकामामध्ये दिरंगाई होत असल्यामुळे तिरोडा गोरेगाव विधासभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक आयोजित केली त्यामध्ये प्रामुख्याने चूरडी चिखली रस्ता बांधकामामध्ये महावितरण विभागाचे विद्युत तार अडथडा निर्माण करीत असल्याने विद्युत तारांची उंची वाढविण्यात यावी,त्याकरिता कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग व महावितरण कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष स्थळी पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कवलेवाडा बोरगाव खाडीपार व गणखैरा पूरगाव सिलेगाव या रस्ता बांधकामाबाबत आमदार महोदयांनी नाराजी व्यक्त केली असून सदर बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु कंत्राटदार व संबधित विभागातर्फे सदर बांधकामावर हलगर्जीपणा दाखविण्यात असल्याबाबत जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिले त्यावर तातडीने गुणवत्तापूर्वक वेळेच्या आधी काम पूर्ण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी संबधित विभागास दिले.
पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये सन २०१९ नंतर फेरफार झालेल्या शेतक-यांना किंवा खरेदी केलेल्या शेतक-यांचे रजिस्ट्रेशन होत नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत हि बाब तातडीने मार्गी लावण्याबाबतच्या सूचना आमदार महोदयांनी दिल्या, तिरोडा नगरपरिषद अंतर्गत महात्मा फुले वार्डातील मागील ४० ते ५० वर्षापासून अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देणे या विषयावर चर्चा करण्यात आली, या बैठकीमध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकारी प्रजीत नायर, सा.बा.विभाग कार्यकारी अभियंता श्री लभाने, मुग्रासयो कार्यकारी अभियंता श्री आव्हाडे, महावितरण कार्यकारी अभियंता श्री जैन,उपभियंता अनिल रहांगडाले, देशमुख उपस्थित होते.