प्रचारासाठी गेलेल्या भाजप खासदार सुनील मेन्ढेना बोळदे/कराडच्या गावकऱ्यांनी लावले हाकलून

Spread the love

जनचेतना/गोंदिया/मोरगांव अर्जुनी/प्रशांत उके

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्यानंतर नेत्यांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे मोठ्या मोठ्या रॅली गावात मतदाराच्या भेटीगाठीना वेग आला आहे नेत्यांकडून गावात जाऊन सभा घेतल्या जात आहेत भंडारा गोंदियातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना प्रचार सभा न घेताच पळतण्याची वेळ आली आहे गावकऱ्यांनी त्यांना सभा न घेता परत पाठवले अर्जुनी मोर तालुक्यातील बोळदे /करड येथे हा प्रकार घडला आहे.

भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेन्ढे हे निवडणूक प्रचारासाठी रात्री ९ वाजताच्या सुमारास अर्जुनी मोरगाव तालूक्यातील बोळदे/करड येथे गेले होते मात्र तेथील गावकऱ्यांनी त्यांना प्रचार सभा न घेताच परत पाठवले गावकऱ्यांनी त्यांना वीज उपलब्ध नसल्याने प्रश्न विचारला गावात १२ तास वीज पुरवठा का नाही? या प्रश्नावरून संताप व्यक्त केला त्यामुळे सुनील मेंढे यांना प्रचारसभा न घेताच परत जाण्याची वेळ आली. या प्रकरणामुळे काही काळ तणावाचा वातावरण निर्माण झाले होते.