ॲड.बाळासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन “स्वाभिमान दिवस” म्हणून संपन्न

Spread the love

जनचेतना/नागपुर/दिलीप तराळेकर

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वाडीत एका विशेष कार्यक्रमांतर्गत त्यांना शुभेच्छा देऊन स्वाभिमान दिवस संपन्न करण्यात आला.वाडी अमरावती महामार्ग स्थित वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कार्यालयात माजी जि.प. दिनेश बन्सोड यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास वाटकर, माथाडी कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे, माजी उपसरपंच दिलीप मेंढे, माजी नगरसेवक प्रमोद भोवरे,माजी ग्रा.पं.सदस्य कंठीरामजी तागडे,विश्वनाथजी कुकसे,पक्षाचे नेते अनिल पुंड इत्यादींनी सर्वप्रथम प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन केले.तद्नंतर ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.सर्वांनी यावेळी स्वाभिमान दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तदनंतर अल्पोपहार वितरित करण्यात आले.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते ईश्वर उके,राजू भोवते,दिलीपभाऊ भोरगडे,गजानन वासनिक,अनिल तिडके, जितू सोनुले,अनिल वानखडे, प्रेम ठवरे, नितीन वाघमोडे,प्रवीण तायडे, बबलू गजभिये,चंदू सोनपिंपळे, भीमरावजी नवाडे,आनंद बोरकर,उमेश खोब्रागडे, विजय हुमणे, वसंता मेश्राम,भगवानजी मेश्राम,अनिल दहिवले, द्वारकाप्रसाद पटले,रवी मेश्राम, प्रवीण तायडे,नितीन वाघमोडे,सचिन खोब्रागडे,बबलू गजभिये, चंदू सोनपिंपळे, बंटी मेश्राम,सिद्धार्थ धाबर्डे इत्यादी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.