अरूण कराळे यांचा सेवानिवृत्त सत्कार

Spread the love

जनचेतना/नागपुर/दिलीप तराळेकर

शैक्षणिक कार्यात अग्रेसर ,कुठलेही काम ईमाने इतबारे करणे ,सर्वाना सोबत घेऊन काम करणे, शिक्षकांच्या पाठीशी सदैव उभे राहणे आणि शाळेला प्रकाशाच्या झोकात आणणारे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी म्हणजे कराळे सर असे प्रतिपादन डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती शिक्षण संस्था नागपूरच्या कार्याध्यक्षा माजी प्राचार्या राजश्री मुंदाफळे यांनी केले.द्रुगधामना हायस्कूलचे पदविधर शिक्षक अरुण कराळे यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.व्यासपीठावर प्राचार्या ज्योती अढावू, सत्कार मुर्ती अरुण कराळे, माजी प्राचार्य गुणवंतराव कराळे, अंकीता कराळे उपस्थित होते.


सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक माजी प्राचार्य , शिक्षणरत्न स्व. मधुकरराव मुंदाफळे व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. संस्थेच्या कार्याध्यक्षा माजी प्राचार्या राजश्री मुंदाफळे यांच्या हस्ते अरुण कराळे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रा. प्रगती पाचपोहर, प्रा. गजानन काकड, शिक्षिका आरती भोरे, से.नि. शिक्षक वसंत हरले ,ग्रंथपाल प्रकाश मस्के यांनी सत्कार मुर्तीच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्राचार्य ज्योती अढावू यांनी केले. संचालन जेष्ठ शिक्षिका आरती भोरे यांनी तर आभार शिक्षिका वंदना मुसळे यांनी मानले. यावेळी प्रा. अविनाश चौधरी, प्रा. बाबुलाल मोरे ,प्रा.नंदकिशोर भोयर, प्रा.अविनाश बारब्दे, प्रा. जयश्री किरणापूरे ,प्रा.शारदा कोरे, प्रा.भाग्यशाली मेश्राम , प्रा.शुभम आढागळे , वैशाली लोही,सुनीता चव्हाण , वसंत हरले, मधुकर कुकडे, सुखदेव भिवगडे, लक्ष्मण खडसे,अनिल भुयार, विलास चौधरी, विलास मुसळे , लक्ष्मण शिंदे ,राजू शेळके,शंकर राऊत , पंढरी धार्मीक, साहेबराव पाचघरे प्रामुख्याने उपस्थित होते.