जनचेतना/अर्जुनी मोरगांव/प्रशांत उके
अर्जुनी मोर येथील भारत पेट्रोल पंप येथे पेट्रोल आणि डिझेल पंपावर ग्राहकांची फसवणूक होत आहे. मीटरकडे लक्ष नसताना इंधन टाकणाऱ्या नोझलमध्ये हातचलाखी करून ‘मापात पाप’ केले जात आहे. ‘०’ रिंडिग न करताचा बाइकमध्ये पेट्रोल सोडले जाते. याबाबत ग्राहकांनी केलेल्या तक्रारी केराच्या टोपलीत टाकल्या गेल्याचा अनुभव येत आहे. पेट्रोल पंपांवरील ही लूट थांबविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग, वैधमापनशास्त्र विभाग, पेट्रोलियम कंपन्याचे अधिकारी यांच्याकडून ‘ऑन दी स्पॉट’ कारवाईची गरज आहे.
दरम्यान, पुरवठा विभाग, वैधमानपन शास्त्र विभाग आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून होणाऱ्या कारवाईवेळी खबऱ्यांकडून पंपमालकांना आधीच ‘टीप्स’ मिळतात. त्यामुळे अनेकदा कारवाई कागदावरच राहते. फसवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणेचे ‘लिकिंग’ असल्याने ग्राहकांच्या लुटीला अधिक बळ मिळत आहे.
पेट्रोल पंपावर ग्राहकांना दुचाकी वाहनात पेट्रोल कमी सोडण्याच्या तक्रारींत सातत्याने वाढ झाली आहे. काही ठराविक पेट्रोल पंपांवर ठराविक किंमतीचे पेट्रोल, नोझलमधील हातचलाखी, सुट्या पैशांचा वाद, ग्राहकांचे लक्ष नसताना मीटरची गती वाढविणे, स्टॅम्पिंगसाठी टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. एकाद्या ग्राहकाने पन्नास रुपयांचे पेट्रोल घेतले आणि दुसऱ्या ग्राहकांना शंभर रुपयांचे पेट्रोल घेतले तर मीटर रिडिंग ‘झिरो’ केले जात नाही. शंभर रुपयांचे पेट्रोल घेतल्यास प्रत्येक पंपावर रिंडीग वेगवेगळे दाखविले जाते. पेट्रोल-डिझेलचा दर सातत्याने बदलतो. मात्र, अनेकदा दर कमी झाला असल्यास, दर बदलाच्या दुसऱ्या दिवशीही जुन्या दरानेच पेट्रोल-डिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत.
अशा तक्रारींची पडतालणी करून वैधमापन शास्त्र विभागाने वितरकांविरोधात खटले दाखल करण्याची गरज आहे. गंभीर तक्रारी असल्यास पंप जप्त करण्याची कारवाईही करण्याची तरतूद आहे. मात्र तसे धाडस अधिकारी करीत नाही. महाराष्ट्र वैध मापनशास्त्र (अंमलबजावणी) नियम २०११ मधील तरतुदींनुसार पेट्रोलियम पदार्थांच्या अचूक वितरणाची खात्री करण्यासाठी प्रत्येक पंपावर पाच लीटर क्षमतेचे प्रमाणित माप ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, काही पंपांवर प्रमाणित माप नाही. त्याची तपासणीही पथकांकडून केली जात नाही. पंपाची पुनर्पडताळणी व मुद्रांकन दर महिन्याला करणे गरजेचे आहे. तेही होत नसल्याची स्थिती आहे.
संयुक्त तपासणी नाहीच
उत्तरप्रदेशमधील काही पेट्रोल पंपावर एक वर्षापूर्वी चिप बसविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे केंद्रीय पेट्रोलियम विभागाकडून राज्यातील सर्वच पंपाची तपासणीची मोहिम राबविली. वाहनांत पेट्रोल टाकणाऱ्या डिस्पेन्सरमध्ये चिप बसविली जाते. टाकीत पेट्रोल पडायचे बंद झाले तरी मीटर रिंडिग सुरूच राहते. ही चिप दिल्ली आणि कानपूरच्या बाजारात एक ते दोन हजार रुपयांना मिळत असल्याचेही तपासात पुढे आले होते. तसच प्रकार साईनाथ पेट्रोल पंप वर तर होत नाही आहे. याची शक्यता आहे.इलेक्ट्रॉनिक चिप बसविल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी तपासणीची गरज आहे. अन्यथा पेट्रोल पंप बंद करा असे सामान्य नागरिकाचे मत आहे.