जनचेतना/वणी/विजय मत्ते
वनी शहरातील अकरावी बारावी साठी झिरो अटेंडन्स प्रवेशात काही खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थी व पालकांची अक्षरशः लूट करत आहेत शिक्षण संस्थेत द्यायचा व खाजगी कोचिंग क्लासेस वाल्यांना लाखो रुपयांची ती घेऊन ते विद्यार्थ्यांना पाठवायचे असा प्रकार सुरू आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा टप्पा म्हणजे इयत्ता दहावी व बारावी येत्या काही दिवसात इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल लागणार आहे.प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचा प्रवेश करणे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे वाटते इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण होऊन अकरावी प्रवेश कुठे घ्यायचा कसा करावा हा पालका पुढे मोठा प्रश्न असतो परंतु पालकाची व विद्यार्थ्याची दिशाभूल करणाऱ्या अनेक शिक्षण संस्था उभे राहिले आहे.
शिक्षण संस्था ज्ञान देण्यापेक्षा पैसे मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकाची दिशाभूल करून तिच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना व पालकांना नेता दिसून येते आहे. महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यामध्ये खाजगी कोचिंग क्लासेस व काही शिक्षण संस्था कडून मात्र त्यांचा मोठा फायदा उठवण्याचा प्रयत्न चालू आहे.आजची स्थिती पाहता काही कॉलेजमध्ये फक्त प्रवेश द्यायचा त्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेली की पेड करायची व खाजगी क्लासेस मध्ये लाखो रुपये देऊन विद्यार्थ्यांना पाठवायचे अशी वस्तुस्थिती आहे शासन एका बाजूला पटपट करणे आधार व्हॅली टेशन नुसार शिक्षकाची संच मान्यता करण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु दुसऱ्या बाजूला कुठल्याही प्रकारचा प्रवेशाचा निकष न लावता कोणत्याही विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेमध्ये शासनाच्या प्रवेश प्रक्रियेचा कुठल्याही प्रकारचा वापर न करता प्रवेश देत आहे.
त्यामुळे पालकाची आर्थिक लूट होताना दिसत आहे आजची परिस्थिती पाहता अशी काही कॉलेज आहेत ती त्या ठिकाणी फक्त कागदावर विद्यार्थी आहे व कॉलेजमध्ये कुठल्याही लेक्चर अथवा प्रॅक्टिकल होता दिसत नाही मग हे विद्यार्थी खाजगी क्लासेस ला जाऊन सीईटी नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षा देतील व नंतर अभियांत्रिकी व मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश घेतील परंतु ते पुढे उत्कृष्ट दर्जाचे डॉक्टर व इंजिनियर कशी तयार होतील हाही प्रश्न आहे प्रवेशासाठी खोटे आश्वासन देऊन आमच्याकडे फक्त परीक्षेसाठी या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना पास करून देणारे सुद्धा काही कॉलेज दिसत आहे त्यांची दैनंदिन वर्गातील उपस्थिती तपासून पहाणे तितके महत्त्वाचे वाटते वेगळ्या कारणाने होणारी पालकाची व विद्यार्थ्याची फसवणूक दिशाभूल थांबवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे वाटते या सर्व गोष्टी जर झाल्या तरच येणारी पिढी ही शैक्षणिक दृष्ट्या प्रगत होईल व आज शिक्षणाचा जो बाजार मांडलेला आहे तो थांबेल का पालकांनी यावर विचार करणे गरजेचे आहे.