जनचेतना/मारेगांव/विजय मत्ते
मारेगाव घरातून बेपत्ता झालेल्या शुभांगी चा मृतदेह गावातील असलेल्या विहिरीत आढळून आल्याची घटना मारेगाव तालुक्यातील बोटूनी गावात मंगळवारी ७मे रोजी सायंकाळी ६वाजेच्या सुमारात उघडकीस आलाय शुभांगी विपुल लालसरे+ वय 24 रा. बोटोनी) असे मयत महिलेचे नाव आहे यावेळी मारेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील बोटोनी येथे शुभांगी विपुल लालसरे तिला 24 एप्रिल रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले सर्वत्र कुटुंब आनंदित असताना 14 दिवसाच्या बाळाला ठेवून 6 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारात घरातून सर्वजण झोपलेले असताना शुभांगी घरातून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास शुभांगी घरातून निघून गेली सर्वत्र शोधा शोध घेतला मात्र ती मिळाली मिळाली नाही गावालगत असलेल्या सरकारी विहिरीच्या काही अंतरावर जलवाहिनीत एका चप्पल आढळून आल्याने शंकेला वाव मिळाली त्यांनी गड टाकण्याचा प्रयत्न प्रयत्नात शुभांगी चा मृतदेह आढळल्याने अख्या गावामध्ये शोक सागरात बुडाले आहे.