जनचेतना/तिरोडा/
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा तालुका तर्फे गुरूवार दि.२ मई २०२४ रोजी तहसिलदार यांना निवेदन देऊन गॅस धारक ग्राहकांना विहित कायदयाची जाणीव होने करीता गॅस गोडाऊन व कार्यालय इथे विहित नियमावली लिहुन ठेवने गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून फसवणूक होणार नाही याकरीता दक्षता घेऊन ग्राहकांनी प्रत्यक्ष तक्रार करण्याकरीता समोर येणे गरजेचे असुन आनलाईन बुकींग केल्याचे नंतर किती तासात घर पोच हंडा देणे, हंडेचे वजन करून देणे, नविन कनेक्शन घेते वेळी शेगडी घेणे बंधनकारक नाहि.
गोडाऊन मधून कुणी ग्राहकाने हंडा घेऊन गेल्यास अतिरिक्त रक्कम कमी करणे इत्यादी ची दखल होऊन ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण होने बाबद निवेदन देऊन मांगणी करण्यात आली आहे. तिरोडा शहर व ग्रामिण परिसरात एकूण तिरोडा, नवेझरी व गंगाझरी अशी तिन एजन्सी आहेत. निवेदन देते वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोडा चे तालुका मार्गदर्शक अब्दुल रफीक शेख, अध्यक्ष-सुशिल भातनकर, सचिव-महादेव घरजारे, संगठन मंत्री-वाल्मीक राऊत, मोहपत मानकर, इत्यादी पदाधिकारी हजर होते.