३५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

जन चेतना/मारेगांव/विजय मत्ते

मारेगाव येथून सात किमी अंतरावर असलेल्या नवरगाव (धरण )येथे एका (35) वर्षीय इसमाने गडपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली.

उमेश अशोक नक्षीने ( 35) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इस मा चे नाव आहे त्याने नवरगाव येथे पीठ गिरणीच्या मागे असलेल्या गोठ्यात दोरीच्या साह्याने आज सोमवार ( 29) ला दुपारी अंदाजे दोन वाजता चे दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून मृतक उमेश यांच्या पाठीमागे पत्नी आई एक मुलगा एक मुलगी व मोठे भाऊ असा मोठा परिवार आहे.

मारेगाव तालुक्यातील *आत्महत्येचे सत्र सुरू असून *ही*मालिका थांबता थांबेना मागील आठवड्यात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याची घटना ताजी असताना पुन्हा आज आत्महत्याची घटना समोर आल्याने प्रशासनाने तालुक्यात आत्महत्या सारखा गंभीर विषय रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे.