जनचेतना/गोंदिया/प्रशांत उके
महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्यांना शास शासनाने ५ रुपये बोनस देण्याचे ठरविले आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यात दुध संघ मागील ७ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रायव्हेट दुध केंद्रावर दुध विक्री करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळत नाही. हि बाब सरकार चा लक्षात आणून द्यावी म्हणून आज दिनांक ३ जुलै २०२४ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार कार्यालय मुंबई येथ आमदार रोहित पवार भेटुन निवेदन देण्यात आले.
यावेळी यशवंत परशुरामकर सभापती बाजार समिती अर्जुनी मोरगाव, सौरभ रोकडे जिल्हा अध्यक्ष, दिनेश कोरे तालुका अध्यक्ष, आशिष येरणे युवक जिल्हाध्यक्ष, मंजु डोंगरवार महिला अध्यक्ष, मंजु वासनिक जिल्हा कार्याध्यक्ष, देवानंद तागडे जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग गोंदिया, तिरथ येटरे महासचिव, बालु वंजारी, इत्यादि या दरम्यान उपस्थित होते.