जनचेतना/चंद्रपुर/विजय मत्ते
मतदानाच्या दिवशी कुणबी व्होट एकत्र आले. जे कुणबी मतदार आयेगा तो मोदी किंवा ती एकटी प्रतिभा धानोरकर निवडून काय करणार? म्हणत होते, ते व्होट पण आज प्रतिभा धानोरकरांच्या पारड्यात गेले.काँग्रेसला धोका असणारे वंचितचे व्होट आज पलटले. स्वतंत्र राजकारण म्हणत वंचितचा प्रचार करणारे व्होट आज भाजप नको म्हणून काँग्रेसकडे गेले. त्याचा मोठा फटका भाजपला बसला आहे.
महिला उमेदवाराला महिलांचा पाठिंबा. केवळ महिला उमेदवार आहे म्हणून अनेक महिला मतदारांनी प्रतिभा धानोरकरांना मतदान केले. ग्रामीण भागात पंजा मोठ्या प्रमाणात चालला. काही ठिकाणी हे परसेंटेज 70*30 असे दिसून आले.मुस्लिम व्होट यावेळी एकगठ्ठा काँग्रेसकडे गेले. दर वेळी काही प्रमाणात मत इतर उमेदवारांकडे जायते. ते यावेळी टळले.अदिवासी पाडे, पोड येथे आदिवासी संघटना, कम्युनिस्ट पक्ष यांनी प्रचंड मेहनत घेतली. ज्या भागात गेल्या वेळी आदिवासी व्होट भाजपकडे गेले ते यावेळी काँग्रेसला मिळाले. तसेच ब्रिगेड सारख्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत भाजपचे बरेच व्होट खेचून आणले.
हंसराज अहिर समर्थक यावेळी जोशात नसल्याने याचा फटका मुनगंटीवार यांना बसला. मुनगंटीवारांचा विकासाचा मुद्दा फेल ठरला. महिवयलांबाबत केलेल्या वक्तव्याने जी इमेज डॅमेज झाली त्याचे डॅमेज कंट्रोलिंग भाजपला योग्य प्रकारे करता आले नाही.कुंपणावरचे व्होट भाजपच्या पक्ष फोडीमुळे काँग्रेसकडे गेले. सर्व पध सारखेच असे म्हणणारे वोट पण ऐनवेळी काँग्रेसकडे वळले. शिवसेना काँग्रेसला मतदान कसे करणार असा अंदाजबांधला जात होता पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी यावेळी काँग्रेसला साथ दिली.(अनेक ठिकाणी फिरून आणि विविध भागातील ब-याच लोकांशी बोलून हा अंदाज बांधला आहे.)