Maharashtra politics : लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याच्या सुनेचा भाजपात प्रवेश

Spread the love

जनचेतना/लातूर/राहुल हटवार

लातूरमधून मोठी बातमी समोर आली आहे, काँग्रेसला चंद्रपूरनंतर आता लातूरमध्ये देखील मोठा धक्का बसला आहे.  चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देवतळे यांच्यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांनी देखील आज भाजपात प्रवेश केला आहे. मात्र दुसरीकडे शिवराज पाटील चाकूरकर यांची भूमिका अद्यापही अस्पष्ट आहे.

नेमकं काय म्हणाल्या चाकूरकर?

आयुष्याच्या चांगल्या वळणावर आणि शुभ मुहूर्तावर मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आम्हाला कुटुंबात राजकीय वारसा लाभला आहे, आणि कुटुंबातून राजकीय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील मिळालं आहे. माझा हा वैयक्तिक निर्णय आहे. मी पहिल्यांदाच देवेंद्र भाऊंसोबत राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे. मी मोदीजींच्या कामावर प्रभावित होऊन भाजपात प्रवेश केला आहे. महिला आरक्षण विधेयक मोदीजींनी पारित केलं, त्यामुळे मी प्रभावित झाले. असं चाकूरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसला चंद्रपुरात देखील मोठा धक्का बसला आहे.  चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विदर्भात हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं आहे. यामुळे आता काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भात तेली समाज मोठ्याप्रमाणात आहे, मात्र असं असतानाही काँग्रेसकडून एकाही तेली समाजाच्या नेत्याला उमेदवारी न देण्यात आल्यानं देवतळे नाराज होते अशी माहिती समोर येत आहे. याच नाराजीमुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे..

.