जनचेतना/गोंदिया/सड़क अर्जुनी/प्रशांत उके
राजकुमार बडोले फाऊंडेशन, बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया, गगन मलिक फाऊंडेशन, तथा त्रीरत्न भुमी सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषद तथा बुध्द मुर्ती वाटप आणी धम्म स्कुलचे उदघाटन २५ ऑगस्ट ला सकाळी अकरा वाजता आशीर्वाद लाॅन सडक /अर्जुनी येथे आयोजित करण्यात आले आहे.या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेला देश,विदेशातील भंते प्रामुख्याने उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेचे उदघाटन माजी सचिव अनु.जाती -जमाती आयोग म.रा.विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ प्रा.डाॅ.संदेश वाघ,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलसचीव यांचे हस्ते होईल. अध्यक्षस्थानी उप मठाधीस ,वाट थाथोंग-शाही मठ बॅकाॅक,थायलंड राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणुन माजी सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले राहणार आहेत. विशेष वंदनीय भंते म्हणुन प्रशासनिक कार्यालय वाट थाथोंग-शाही मठ बॅकाक थाईलॅडचे भंते फ्रमहा सिरीचय यनावत्थानो,गुजरातचे भंते प्रशिलरत्न गौतम,डव्वा येथील भंते संघधातु, औरंगाबाद येथील भंते धम्मज्योती प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणुन चित्रपट अभिनेते गगन मलिक, बॅकाक थाईलॅडचे कॅ.डाॅ. नटकीट सी.मंगल, भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष डाॅ. चंद्रबोधी पाटील, गोंदिया-भंडारा संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, माजी आमदार संजय पुराम, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ. वर्षा गंगणे, अर्जुनी मोर.चे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे, कृऊबा संचालिका शारदाताई बडोले, कृऊबा सभापती डाॅ. अविनाश काशीवार, कृऊबा सभापती यशवंत परशुरामकर, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार अक्षय पोयाम, उपविभागीय अभियंता राहुल टेभुर्णे, राजहंस ढोक, झाडीपट्टीच्या कवियत्री अंजनाताई खुणे, तिबेटियन वस्तीचे अध्यक्ष चो ग्याल्टसेन, महामंत्री रचनाताई गहाणे, सामाजीक कार्यकर्ते शब्बिरभाई पठाण,तसेच जिल्ह्यातील विविध विभागात कार्यरत जेष्ठश्रेष्ठ कार्यकर्ते, वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेचे औचित्य साधुन अर्जुनी मोर. विधानसभा अंतर्गत ज्या गावातील बौध्द विहारात बुध्द मुर्ती नसल्यास अती आवश्यक ठिकाणी बुध्द मुर्ती वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच धम्म स्कुलचे उदघाटन ही संपन्न होणार आहे. आज जगाला युध्द नको तर बुध्द हवा याच आधारावर या आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म परिषद मधे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील तथा गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील सर्व महिला, पुरुष व युवक, युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजकुमार बडोले फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.