जनचेतना/मारेगांव/विजय मत्ते
गावाच्या विकासात्मक कामे करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी ग्रामपंचायतला उपलब्ध होतो त्या निधीतून गावाच्या विकासाची कामे करायची असतात परंतु तालुक्यातील दांडगाव गावामध्ये सर्वत्र सांडपाणी पसरत असल्याने घाणीचे साम्राज्य झालेले आहेत परंतु याकडे संबंधित ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे परंतु ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करून बघायची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळते.
सविस्तर वृत्त असे की गावाचा विकास कार्यासाठी लोकप्रतिनिधी निवडल्या जातात जेणेकरून गावातील समस्या दूर होतील परंतु ग्रामपंचायत दांडगाव मध्ये सर्वत्र सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही लोकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले परंतु या बाबीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करून बघायची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळते गावाचे कारभारी नाही बरे त्यामुळे फुटले सांडपाण्याची झरे असे चित्र डोळ्यासमोर दिसते आम्ही शासनाचा कर भरतो मग आम्हाला सुविधा का नाही असे प्रश्न गावातील लोकांमध्ये गुणगुणत आहे घरोघरी वाहे गंगा अशी प्रचिती डोळ्यासमोर दिसते तरी ग्रामपंचायत दाडगाव यांनी या सांडपाण्याची तात्काळ विल्हेवाट लावावी असे समस्त जनतेतून बोलल्या जात आहे.